कुडाळ : मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला नाही. केवळ ‘मातोश्री’ या मतदारसंघात आहे, इतकेच, असे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
कुडाळ येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी आहे, असे स्पष्ट करीत राणे म्हणाले, वांद्र्यातून अनेकवेळा काँग्रेसने प्रतिनिधित्व केले आहे. हा मतदारसंघ म्हणज्ो शिवसेनेचा बालेकिल्ला नाही. ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान ‘मातोश्री’ या मतदारसंघात आहे. एवढाच काय तो शिवसेनेचा संबंध आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे, असे ते म्हणाले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}