मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पिंजºयांच्या बांधकामात वादग्रस्त ठरलेल्या हायवे कन्स्ट्रक्शनला पुन्हा एकदा कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. पेंग्विनसाठी कक्ष तयार करताना या कंपनीने अनुभवाची चुकीची कागदपत्रे सादर करून, यापूर्वीही काम मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हे समोर येताच, त्याचे काम मध्येच थांबविण्यात आले. या कंपनीने पुन्हा पिंजºयांच्या कंत्राट मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. जुन्या अनुभवाच्या आधारे ही कंपनी पात्र ठरत असल्याने पिंजºयाचे कंत्राट या कंपनीच्या पदरात पडणार आहे.राणीबागेच्या नूतनीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वाराजवळील जागेचे सुशोभीकरण, पेंग्विन कक्ष आदींचे काम करण्यात आले आहे, तर दुसºया टप्प्यात राणीबागेत येणाºया नवीन प्राण्यांसाठी पारदर्शक असणारे आणि त्यांना वातावरण अनुकूल असणारे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. मात्र, या कामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीने अनुभवाचे बनावट कागदपत्र सादर केल्याचे उघड झाले होते. याचे तीव्र पडसाद उमटून या कंपनीचे कंत्राटच रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. याची चौकशी करून दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती.दरम्यान, राणीबागेत येणाºया नवीन व सध्या असलेल्या प्राण्यांसाठी १७ पिंजरे बांधण्यात येणार आहेत. पिंजरे उभारण्यासाठी या कंपनीला ७६.३४ कोटींचे कंत्राट देण्यात येत असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ‘हाय वे’ या कंपनीने पेंग्विन पक्ष्याच्या पिंजºयाचे काम चांगल्याप्रकारे केल्यामुळे राणीबागेतील अन्य पिंज-यांचे कामही याच कंपनीला देण्यात येत असल्याचा युक्तिवाद पालिकेचे अधिकारी करीत आहेत. विविध प्राण्यांसाठी बांधण्यात येणा-या निवासस्थानांसाठी प्रदर्शनीय गॅलरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बिबट्याचा पिंजरा आणि लहान मांजरींसाठी संकुलात तारांपासून तयार केलेल्या दोरखंडाच्या जाळीचे कुंपण बसविण्यात येणार आहे. याशिवाय अॅक्रेलिक ग्लास, जीवन समर्थन प्रणाली आणि कृत्रिम दगडांचा समावेश असणार आहे.सिंगापूरच्या धर्तीवर कायापालट१२० कोटी रुपये खर्च करून राणीबागेचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सिंगापूरस्थित ज्युरोंग पार्कच्या धर्तीवर या प्राणिसंग्रहालयाचा कायापालट होणार आहे.
वादग्रस्त कंपनीलाच राणीबागेतील पिंजऱ्याचे कंत्राट?; प्रस्ताव स्थायी समितीपुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 02:26 IST