Join us

विसर्जनादरम्यान रणधीर आणि ऋषी कपूर यांची पत्रकाराला मारहाण

By admin | Updated: September 15, 2016 22:27 IST

देशभरात आज बाप्पाचं विसर्जन होत असताना मुंबईत अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.15- देशभरात आज  बाप्पाचं विसर्जन होत असताना मुंबईत अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.    

कपूर कुटुंबाच्या आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनावेळी  रणधीर कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केली. गणपतीची आरती झाल्यावर एका पत्रकाराने रणधीर यांना प्रतिक्रिया विचारली होती, मात्र संतापलेल्या रणधीर कपूर यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. तर ऋषी कपूर यांनीही सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका चाहत्याला मारहाण केली.