Join us

स्थायी सभापतीपदी रमेश म्हात्रे

By admin | Updated: April 17, 2015 22:58 IST

स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जव्वाद डोण यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जव्वाद डोण यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. स्थायीचे सभापतीम्हणून म्हात्रे यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे जितेंद्र भोईर हे अनुपस्थित राहिले. दांडी मारणाऱ्या भोईर यांच्यावर पक्ष काय कारवाई करतो, याकडे आता लक्ष लागले आहे. स्थायी समितीत कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने स्थायीत त्यांची काय भूूूमिका असेल, याकडे लक्ष लागले होते. तसेच मनसेनेही राष्ट्रवादीला साथ दिल्याने त्यांचा कल कुठे, यावरही शिवसेनेचा जय-पराजय अवलंबून होता. ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी या पीठासीन अधिकारी म्हणून या निवडणुकीला उपस्थित होत्या. कामकाजाला प्रारंभ होताच उमेदवारी माघारी घेण्याच्याकालावधीत राष्ट्रवादीचे उमेदवार डोण यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडलीच नाही. पीठासीनअधिकारी जोशी यांच्याकडून शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षांनी टाकलेली नांगी पाहता या निवडणुकीत आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती आहे.