Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेसप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:31 IST

मुंबई : कोकणातील भाजपा नेते व माजी आमदार रमेश कदम, तसेच सिंधुदुर्ग शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख वसंत केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा खेडेकर, खेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटणे आदी नेत्यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबई : कोकणातील भाजपा नेते व माजी आमदार रमेश कदम, तसेच सिंधुदुर्ग शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख वसंत केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा खेडेकर, खेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटणे आदी नेत्यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत टिळकभवन येथील काँग्रेस कार्यालयात पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडला.याप्रसंगी अशोक चव्हाण म्हणाले की, रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे कोकणात पक्षाची ताकद वाढेल. मध्यंतरीचा काही काळ वगळता, कोकण हा नेहमीचकाँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे.यापुढे प्रामाणिकपणे व एकजुटीने काम केल्यास, निश्चितच कोकणात काँग्रेसला चांगले यश मिळू शकेल, तर यापुढे रत्नागिरी व कोकणात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आम्ही जुना-नवा वाद निर्माण न करता एकदिलाने काम करू. येत्या महिनाभरात रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याची घोषणा रमेश कदम यांनी केली.

टॅग्स :इंडियन नॅशनल काँग्रेस