Join us

आंबोलीतील रामदास क्रीडांगण घेणार मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:05 IST

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील रामदास क्रीडांगण आता मोकळा श्वास घेणार आहे. मुंबई महापालिकेच्या बाजार व उद्यान समिती अध्यक्षा ...

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील रामदास क्रीडांगण आता मोकळा श्वास घेणार आहे. मुंबई महापालिकेच्या बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी आंबोलीतील भर्डावाडी येथील रामदास क्रीडांगणच्या दुरवस्थेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांसोबत सदर उद्यानास भेट दिली.

तेथे मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना, खेळाडूंना, क्रीडांगणातील नादुरुस्त शौचालय, पावसात पडलेली झाडे तसेच क्रीडांगणात तुंबणारे पावसाचे पाणी यामुळे बराच त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.

याची त्वरित दखल घेऊन तातडीने या समस्येचे निराकरण करण्यासाठीचे निर्देश प्रतिमा खोपडे यांनी महापालिका प्रशासनास दिले.

याप्रसंगी प्रतिमा खोपडे यांच्यासोबत विधानसभा संघटिका वीणा टाँक, अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील खाबिया जैन, वर्सोवा विधानसभेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये व अंधेरी विधानसभेचे उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, तसेच माजी नगरसेविका ज्योती सुतार आदी उपस्थित होते.