Join us
Daily Top 2Weekly Top 5

बचावपक्ष म्हणतो रामचंद्र करंजुले निदरेष?

By admin | Updated: December 10, 2014 02:17 IST

कल्याणी सेवा संस्थामधील गतिमंद मुलींवर बलात्कार, गँगरेप व खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेले या संस्थेचे प्रमुख रामचंद्र करंजुले हे निदरेष असल्याचा दावा बचावपक्षाने मंगळवारी उच्च न्यायालयात केला़

मुंबई : कल्याणी सेवा संस्थामधील गतिमंद मुलींवर बलात्कार, गँगरेप व खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेले या संस्थेचे प्रमुख रामचंद्र करंजुले हे निदरेष असल्याचा दावा बचावपक्षाने मंगळवारी उच्च न्यायालयात केला़
या शिक्षेविरोधात करंजुले यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आह़े तर राज्य शासनानेही या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली आह़े या दोन्ही याचिकांवर न्या़ पी़ व्ही़ हरदास व न्या़ गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी सुरू आह़े त्यात करंजुले यांच्याकडून अॅड़ महेश वासवानी, अॅड़ निरंजन मुंदरगी, अॅड़ धारनी नागदा, अॅड़ विनोद मोरे, अॅड़ अनुश्री मोरे, अॅड़ सुहाई शरीफ व अॅड़ गौरव माने हे बाजू मांडत आहेत़
करंजुले हे निदरेष आहेत़ आश्रमशाळेत एकूण 19 मुली होत्या़ त्यापैकी केवळ तीनच मुलींची 
साक्ष सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात नोंदवली़ विशेष म्हणजे साक्ष देणा:या मुलींसोबत पोलीस निरीक्षक रश्मी करंदीकर व सुनंदा तरे या सतत होत्या़ काय साक्ष द्यावी व आरोपींना कसे ओळखावे हे त्या मुलींना सांगितले 
जाते होत़े मात्र सत्र न्यायाधीशांनी याकडे दुर्लक्ष केल़े बचावपक्षाने एखादा मुद्दा मांडल्यास न्यायालयाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती, असा युक्तिवाद 
अॅड़ वासवानी केला़ यावर उद्या बुधवारी पुढील सुनावणी होणार 
आह़े (प्रतिनिधी)
 
एकही प्रत्यक्ष पुरावा नाही : महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात करंजुले 
यांनी खून केल्याचा एकही प्रत्यक्ष पुरावा सरकारी पक्षाकडे नाही़ असे असताना देखील सत्र न्यायालयाने करंजुले यांना फाशीची शिक्षा ठोठावली असून हे गैर  आहे, असा दावा अॅड़ वासवानी यांनी न्यायालयासमोर केला़