Join us

रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:07 IST

मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहनरमजान ईद घरी राहूनच साजरी करामुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन

रमजान ईद घरी राहूनच साजरी करा

मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे मुस्लिम बांधवांनी आज (शुक्रवारी) घरी राहूनच रमजान ईद साजरी करावी, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रमजान ईदकरिता मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता, सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे पाेलीस आयुक्त म्हणाले. आतापर्यंत सर्वांनीच सहकार्य केले आहे, पुढेही कराल अशी खात्री आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी नमूद केले. ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असे सांगत आयुक्तांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

............................