मुंबई : महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या कामकाजाच्या प्रसिद्धीसाठी महावितरणचा जनसंपर्क विभाग कौशल्याने सांभाळणारे राम दोतोंडे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे़ त्यानुसार त्यांनी आज पालिकेच्या जनसंपर्क महाव्यवस्थापकपदाची धुरा स्वीकारली़ विशेष म्हणजे त्यांच्या निवृत्तीसाठी एक महिना उरला आहे़विकास आराखड्यावरील वादग्रस्त त्रुटींवर ठाम राहत माजी आयुक्त कुंटे यांनी राज्य सरकारचा रोष ओढावून घेतल्याने कार्यकाळ संपण्याच्या तीन दिवस आधीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली़ मात्र नवे आयुक्त आपल्या प्रसिद्धीविषयी जागरूक असल्याचे दिसून येते़ म्हणूनच दोतोंडे यांना विशेष तरतुदींतर्गत पालिका सेवेत घेण्यात आले आहे़ प्रसिद्धीमाध्यम आणि पालिका प्रशासनामधील दुवा कायम ठेवणे हे यामागचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येते़ (प्रतिनिधी)
महापालिकेच्या जनसंपर्क महाव्यवस्थापकपदी राम दोतोंडे
By admin | Updated: June 2, 2015 04:45 IST