Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनूप जलोटा आणि कृतिका श्रीवास्तव यांचे राम भजन; 'श्री राम पधारे हैं...',  रसिकांच्या भेटीला

By संजय घावरे | Updated: January 21, 2024 18:51 IST

भारतीय संगीत विश्वात भजन सम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या अनुप जलोटा यांचेही नवीन भजन रसिकांच्या भेटीला आले आहे.

मुंबई - अयोध्येत श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीच्या बऱ्याच गायकांनी रामनामाचा महिमा वर्णनारी गाणी बनवली आहेत. भारतीय संगीत विश्वात भजन सम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या अनुप जलोटा यांचेही नवीन भजन रसिकांच्या भेटीला आले आहे.

आजवर बऱ्याच नवोदित गायक-गायिकांसोबत गाणाऱ्या अनूप जलोटा यांनी कृतिका श्रीवास्तव यांच्या साथीने राम नामाचा जयघोष करणारे 'श्री राम पधारे हैं...' गीत गायले आहे. कृतिका श्रीवास्तव या मूळच्या भोपाळमधील गायिका आहेत. त्यांनी आजवर संगीत क्षेत्रात बरेच काम केले आहे. नुकत्याच अनुप जलोटा यांच्यासोबत रिलिज झालेल्या त्यांच्या 'श्री राम पधारे हैं...' या भजनाला सॅम ए. आर. यांनी संगीत दिले आहे. अमित कश्यप यांनी लिहिलेल्या या भजनाचे  संगीत संयोजन दर्शन सुतार यांनी केले आहे. अनुप जलोटा आणि कृतिका यांच्या आवाजातील हे गाणे सर्व सांगीतिक प्लॅटफॉर्म वर ऐकता येऊ शकेल.

टॅग्स :मुंबई