नवी मुंबई : शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, स्वातंत्र्य व सुरक्षिततेसाठी काँग्रेसने श्वास मशाल ज्योत रॅलीचे आयोजन केले होते. क्रांती दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
जुईनगर येथील गावदेवी चौक, नेरूळ सेक्टर 25 ते नेरूळ
स्टेशनच्या पश्चिमेर्पयत ही रॅली आयोजित केली होती. शहरवासीयांमध्ये विशेषत: युवा वर्गामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखावा, त्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत, ज्येष्ठांच्या सुरक्षेचाही संदेश देण्यात आला. रॅलीच्या समारोप प्रसंगी शासकीय, प्रशासकीय, सुरक्षा, उद्योग व इतर क्षेत्रत उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
या रॅलीमध्ये काँग्रेसच्या नवी मुंबई प्रभारी छायाताई आजगावकर, जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, संतोष शेट्टी, रंगनाथ औटी, निशांत भगत, विजय वाळूंज, रविंद्र सावंत, संजय यादव, सुरेश शिंदे व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)