Join us

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कर्जतमध्ये रॅली

By admin | Updated: January 25, 2015 22:37 IST

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कर्जत तहसील कार्यालयाच्यावतीने कर्जत तालुक्यात रॅली, रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कर्जत तहसील कार्यालयाच्यावतीने कर्जत तालुक्यात रॅली, रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयाचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कर्जत, कडाव, कशेळे, नेरळ आणि कळंब या पाच मंडळ अधिकाऱ्यांच्या विभागात या स्पर्धांचे आयोजन केले होते. कर्जत शहरात अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या राष्ट्रीय सुरक्षा दल, एनसीसी आणि गाईडच्या दीडशे विद्यार्थ्यांची रॅली आज सकाळी साडेआठच्या दरम्यान काढण्यात आली. याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र घायाळ, निवडणूक लिपिक अविनाश गुरले, लिपिक सी. टी. आंधळे, सचिन सोनावणे, भीमराम पगारे, सुनिता खडे आदींसह शिपाई, कोतवाल पोलीस पाटील आदी उपस्थित होते. ही रॅली अभिनव ज्ञान मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महावीर पेठ, जकात नाका, मुख्य बाजारपेठ, कोतवाल नगर या ठिकाणी फिरली. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यक्रम साजरा केला. (वार्ताहर)