Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतच्या भावाला अटक

By admin | Updated: January 10, 2016 01:36 IST

अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंत याला शुक्रवारी रात्री ओशिवरा पोलिसांनी अटक केली. एका महिलेला अश्लील हावभाव करून दाखविल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तूर्तास त्याची जामिनावर सुटका

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंत याला शुक्रवारी रात्री ओशिवरा पोलिसांनी अटक केली. एका महिलेला अश्लील हावभाव करून दाखविल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तूर्तास त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ओशिवरा भागातील सीसीडीमध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. तक्रारदार महिला या ठिकाणी आली होती. त्यावेळी राकेशने तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव केल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)