Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी पौर्णिमा : ओवाळणी म्हणून मास्क, कोविड प्रतिबंधात्मक बाबींच्या पालनाचे वचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:08 IST

मुंबई : मुलुंड जम्बो कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना राखी पौर्णिमेला आप्तांना भेटणे शक्य नव्हते. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न ...

मुंबई : मुलुंड जम्बो कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना राखी पौर्णिमेला आप्तांना भेटणे शक्य नव्हते. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून रुग्णालयात राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारार्थ दाखल असलेल्या भावांना; तर कोविड बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून सण साजरा केला.

ओवाळणी म्हणून भावांनी बहिणींना मास्कची भेट देत कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे वचन घेतले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली. जम्बो रुग्णालय हे मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि कृडास या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेच्या जागेवर १५ जुलै २०२० पासून कार्यरत आहे. आजवर या रुग्णालयाद्वारे तब्बल १३ हजारांपेक्षा अधिक कोविडबाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयात सध्या ३०८ खाटा असून यांपैकी ५८ खाटा या अतिदक्षता खाटा आहेत.