Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोद तावडे यांना राजनाथ सिंहांच्या रक्षकांचा हिसका

By admin | Updated: October 30, 2014 01:57 IST

विनोद तावडे हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षा कवच भेदून त्यांच्या मोटारीत प्रवेश करण्याचा आगंतूकपणा करीत असताना त्यांना सुरक्षारक्षकांनी बखोटीला धरून बाहेर काढले.

मुंबई : महाराष्ट्राच्या सरकारमध्ये गृहमंत्री होण्याची स्वप्ने पाहणारे भाजपा नेते विनोद तावडे हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षा कवच भेदून त्यांच्या मोटारीत प्रवेश करण्याचा आगंतूकपणा करीत असताना त्यांना सुरक्षारक्षकांनी बखोटीला धरून बाहेर काढले.
मंगळवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यावर राजनाथ सिंह निघाले. तेव्हा त्यांच्या मोटारीत  मागील आसनावर बसण्याकरिता तावडे यांनी दरवाजा उघडला.  व ते बसत असताना सिंह यांच्या सुरक्षेकरिता असलेल्या ब्लॅक कॅट कमांडोंनी तावडे यांना अडवले. त्यावर तावडे हुज्जत घालू लागले. अखेरीस तावडे यांना हाताला धरून बाजूला करण्यात आले. तेव्हा राजनाथ सिंह आले आणि  गेले. (विशेष प्रतिनिधी)