Join us

राजीव गांधी आरोग्य योजना मुंबईकरांसाठी सर्वांत ‘जीवनदायी’

By admin | Updated: November 27, 2015 00:12 IST

कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर : अंमलबजावणीत मुंबई पहिल्या स्थानी

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूरसर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य’ योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्हा चौथ्या, तर नंदुरबार जिल्हा शेवटच्या क्रमांकावर आहे. या योजनेला २१ नोव्हेंबर २0१५ रोजी दोन वर्षे पूर्ण झाली.राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक हे जिल्हे आघाडीवर, तर नंदूरबारचा शेवटचा क्रमांक लागतो. या एका वर्षात मुंबईमध्ये या योजनेचा २१ हजार ६०५ जणांनी लाभ घेतला. यासाठी ६९ कोटी १७ लाख ४७ हजार ६१० रुपये खर्च झाले आहेत, तर नंदुरबार जिल्ह्यात वर्षात केवळ ९० जणांनी याचा लाभ घेतला. यासाठी फक्त सहा लाख ५१ हजार रुपये खर्च करण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांत सुमारे ३० हजार ३२८ जणांनी याचा लाभ घेतला, तर सुमारे ८६ कोटी ४५ लाख रुपये राज्य सरकारने यावर खर्च केला आहे. दरम्यान, या योजनेमध्ये ९७१ आजार असले, तरी काही आजारांचा या योजनेत समावेश नाही, अशा आजारांवर उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत केली जाणार आहे. यामध्ये हृदयशस्त्रक्रिया, ट्रामा (रस्त्यावरील भीषण अपघात), मेंदूमधील रक्तस्त्राव, कर्करोग या आजारांचा समावेश आहे. या कक्षामार्फत रुग्णांना एक लाखापासून ते दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे.दोन वर्षांत या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेबाबत कुणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी प्रत्यक्ष भेटावे.- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, जीवनदायी आरोग्य योजना, कोल्हापूर.