Join us  

बकरा बाजारात राजस्थानी महिला व्यापाऱ्यांची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:22 AM

१५ दिवसांत २ लाख १३ हजार बकऱ्यांची विक्री

मुंबई : बकरी ईदनिमित्ताने आशिया खंडातील सर्वांत मोठा कत्तलखाना म्हणून ओळख असलेल्या देवनार पशूवध केंद्रात २ लाख ३७ हजार बकऱ्यांची आवक झाली. यापैकी २ लाख १३ हजार बकºयांची विक्री झाली आहे. या पंधरवड्याच्या बाजारात यंदा पहिल्यांदाच राजस्थानी महिला व्यापाºयांनीही उडी घेतली होती. त्यांचा सहभाग लक्षणीय होता.या बाजारात जम्मू-काश्मीरपासून भारताच्या विविध ठिकाणांतील व्यापाºयांनी २ लाख ३७ हजार बकरे विक्रीसाठी आणले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो आकडा ३० हजाराने वाढलेला आहे. १० आॅगस्टपासून सुरू झालेल्या या बाजारात सिरोही, अजमेरी, बारबेरी, सोहत, राजस्थानी, जमुनापरी या बकºयांना जास्त मागणी होती. पंधरा दिवसांच्या या बाजारात दिवसाला ५ लाखांहून अधिक गर्दी येथे जमत होती.त्यात यंदाच्या गर्दीत राजस्थानच्या महिला व्यापाºयांचे प्रमाण लक्षणीय होते. एकूण व्यापाºयांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण १० टक्के होते. त्याही गेले १५ दिवस येथे तळ ठोकून होत्या. त्यांच्यासाठी पालिकेने फिरते सुलभ शौचालय, स्नानगृहाची व्यवस्था केली होती. तसेच परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने २१३ सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. यावर तेथीलच नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत होते.शुक्रवारी या बाजाराच्या शेवटच्या दिवशी एकूण २ लाख १३ हजार बकºयांची विक्री झाल्याची माहिती देवनार पशुवध केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी दिली. दहा हजारांपासून दीड लाख रुपयाला हे बकरे विक्री करण्यात आले. यामध्ये राजस्थानचा बकरा दीड लाख रुपयांत विकला गेला.चोरानेही मारला डल्लायादरम्यान चोरानेही डल्ला मारला. तब्बल १२ बकरे चोरी केले. तर काही व्यापाºयांचे पैसे लुटल्याच्याही घटना घडल्या.पोलिसांनी सीसीटीव्हींच्या मदतीने चोरांना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत ९ आरोपींना देवनार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :मुंबई