Join us
Daily Top 2Weekly Top 5

चारकोपच्या त्रिमूर्ती मित्र परिवाराने उभारले राजस्थानी मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:39 IST

कांदिवली पश्चिम चारकोप सह्याद्री येथील त्रिमूर्ती मित्र परिवार या गणपती मंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबई : कांदिवली पश्चिम चारकोप सह्याद्री येथील त्रिमूर्ती मित्र परिवार या गणपती मंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा मंडळाने २० बाय ३० फूट जागेत राजस्थानी मंदिर उभारले आहे. पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट कंपनी, एमएम साउंड व डेकोरेटर सुदाम प्रसाद यांच्या सहकार्याने येथे हा देखाव्याचा भव्य सेट उभारला आहे. येथील देखावा बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.हे मंडळ गेली २५ वर्षे अनेक उपक्रम राबवत असून सातत्याने लहान मुलांचे नृत्य व अन्य कार्यक्रम आयोजित करून त्यांना बक्षिसे वाटप करीत आले आहे. यंदा रौप्य महोत्सवी वर्षातदेखील स्त्रियांसाठी हळदी-कुंकू, लहान मुलांच्या विविध स्पर्धा आणि भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करून या मंडळाने एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव