Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणादानं घेतली राज ठाकरेंची भेट! चालतंय की..!

By admin | Updated: March 14, 2017 21:01 IST

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेद्वारे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता हार्दिक जोशी याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेद्वारे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता हार्दिक जोशी याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील आपल्या खास कोल्हापुरी शैलीत 'चालतंय की' म्हणून सगळ्यांच्याच मनात घर करणा-या राणाची भूमिका हार्दिक जोशीने साकारली आहे. हार्दिक जोशी हा मुळचा मुंबईचा असून गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या शूटिंगमुळे तो कोल्हापूरात होता. मात्र, आता होळीच्या सुटीमुळे तो मुंबईला आला आहे. 
दरम्यान, आज हार्दिकने राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्याने राज ठाकरेंचा खूप मोठा फॅन असल्याचे सांगितले. तसेच,  या भेटीत हार्दिकने त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.