मुंबई : सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बनावट प्रोफाईल तयार करणा:या अज्ञात आरोपींविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडूनही सुरू असल्याचे पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.