Join us  

राज ठाकरेंची टीका मनावर घेत नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 4:46 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॅनेडियन नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून केलेल्या टीकेबद्दल काय वाटते, या ‘लोकमत’ चे सहव्यवस्थापकीय संचालकआणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला, मला बिलकूल वाईट वाटले नाही.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॅनेडियन नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून केलेल्या टीकेबद्दल काय वाटते, या ‘लोकमत’ चे सहव्यवस्थापकीय संचालकआणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला, मला बिलकूल वाईट वाटले नाही. मी राज ठाकरेंची टीका फारशी मनाला लावून घेतली नाही. कारण, आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकालाच हवे ते बोलण्याचा हक्क आहे.यापुढच्या काळात ठोस सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर भर देणार आहे. चित्रपटासारखे माध्यम मी समाजासाठी वापरण्याचे ठरवले आहे, असेही त्याने स्पष्ट केले.लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर सोहळ्यात रंगलेल्या मुलाखतीची प्रश्नोत्तरे-ऋषी दर्डा: ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय आहे ?अक्षय कुमार: मी महाराष्ट्रातच घडलो आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने मला आज ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ हा पुरस्कार दिला ह्याचं मला विशेष कौतुक आहे.ऋषी दर्डा: तू आयुष्यात खूप चढउतार पाहिलेत. एके काळी तुझे सलग १६ सिनेमे फ्लॉप झाले. तेव्हा तू करियरमधील अपयशाकडे कसा पाहत होतास, त्या स्थितीतही तू पॉझिटिव्ह कसा राहिलास?अक्षय कुमार: एक वेळ अशी होती की ओळीने १६ सिनेमे फ्लॉप झाले. इंडस्ट्रीतून बाहेर पडतो की काय अशी भीतीही होती. पण मी मार्शल आर्टस शिकलोय. थोडीबहुत बॉक्सिंगही खेळलोय. त्यामुळे कठीण प्रसंगात कसं स्थिर ठेवायचं; हे मला खेळांमुळे कळलंय. आयुष्यात आलेल्या या चढउतारांचा धैर्याने सामना केला. करिअर म्हटलं की अशा गोष्टी घडत असतातच.ऋषी दर्डा: आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही व्यासपीठावर उपस्थित आहे. तू अनेक सामाजिक कामांमध्ये सहभागी असतोस तू यावेळी राज्य सरकारला काही सुचवू इच्छितोस का ?अक्षय कुमार: मी सल्ला देण्यापेक्षा एक किस्सा सांगतो. तो मला बायकोने नुकताच सांगितला. ऐकून मीचकित झालो. मध्यप्रदेशमधील एका गावातील ही घटना आहे. तेथे मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने २० आंब्याची झाडं लावण्यात येतात. ती मुलगी ५ वर्षांची झाली की त्या आंब्याच्या विक्रीतून मिळणारा पैसा तिच्या शिक्षणासाठी वापरला जातो. ती झाडंही तिच्या नावावर केली जातात. आपण या गावाकडे विमानातून नजर टाकली की झाडंच झाडं दिसतात. पर्यावरणाचाही ºहास होत नाही व मुलींच्या शिक्षणाचा प्रश्नही सुटतो. अशा योजना महाराष्ट्र सरकारनेही छोट्या छोट्या गावांत सुरू कराव्यात ज्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेलाही चालना मिळेल.>मुख्यमंत्र्यांनी दिली अक्षय कुमारला आॅफर!गेल्या काही वर्षांतील तुझ्या चित्रपटांमध्ये ठोस सामाजिक संदेश होता. सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी संसद व विधानसभा हेही चांगले व्यासपीठ आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने दिलेली राज्यसभेच्या खासदारकीची आॅफर तू स्वीकारशील का? असा प्रश्न ऋषी दर्डा यांनी अक्षय कुमारला विचारताच व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षयला उमेदवारी देण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. त्यावर अक्षय कुमार म्हणाला, राजकारणात आल्यानंतर त्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे, असे मला वाटते. सध्या मला चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. मला ठोस सामाजिक संदेश देणाºया चित्रपटांची निर्मिती करायची आहे.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८अक्षय कुमार