Join us

राज श्रॉफ यांची ३५ कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:07 IST

ईडीची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री ...

ईडीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची अंधेरीतील सुमारे ११ हजार चौरस फुटांची स्थावर मालमत्ता जप्त केली. त्याची किंमत ३५.४८ कोटी असल्याचे सांगण्यात येते. एचडीआयएल प्रमोटर्सच्या वाधवान बंधुंनी केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

राकेश वाधवान, सारंग वाधवान यांच्यावर दाखल मनी लाँड्रिंगच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी कर्ज मिळविले. राज श्रॉफ व त्यांच्या पत्नी प्रीती यांनीही त्यामध्ये गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने ईडीने त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली. अंधेरी (पूर्व) कॅलेडोनिया कन्स्ट्रक्शनमधील सुमारे १०,५५० चौरस फूट जागेचे दोन व्यावसायिक गाळे जप्त केले आहेत.