Join us

राज कुंद्रा होता नवे अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:06 IST

गहना वशिष्ठची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अश्लील चित्रफीतनिर्मितीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा ...

गहना वशिष्ठची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अश्लील चित्रफीतनिर्मितीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा नवीन अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती अभिनेत्री गहना वशिष्ठने दिली आहे.

या अ‍ॅपमध्ये चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि फिचर फिल्म्सचा समावेश करण्यात येत होता, असेही तिने सांगितले. त्यातील एका चित्रपटासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला भूमिका देण्याचा विचार होता. तर दुसऱ्या एका स्क्रिप्टसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचाही विचार केल्याचे गहनाने सांगितले.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गहनाने या बाबी स्पष्ट केल्या आहेत, ती म्हणाली, ‘राज कुंद्राच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा मला ‘बॉलिफेम’ या अ‍ॅपविषयी समजले. हे नवीन अ‍ॅप लाँच करण्याचे प्लँनिंग तो करीत होता. चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि फिचर फिल्म्सचे अ‍ॅप त्याला लाँच करायचे होते. यामध्ये बोल्ड दृश्ये समाविष्ट करण्याचा कुठेच त्याचा विचार नव्हता. आम्ही स्क्रिप्टवरही चर्चा केली होती. त्यातील एका स्क्रिप्टसाठी आम्ही शमिता शेट्टीचा विचार केला तर दुसऱ्या स्क्रिप्टसाठी सई ताम्हणकर आणि दुसऱ्या कलाकारांचा विचार होता. मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते आणि त्याच्या अटकेपूर्वी आम्ही याच विषयावर चर्चा केल्याचे तिने सांगितले.