Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 06:29 IST

मुंबईसह राज्यात कडाक्याचे ऊन पडले असतानाच दक्षिणपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १५ मार्च रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यात कडाक्याचे ऊन पडले असतानाच दक्षिणपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १५ मार्च रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.१६ मार्च रोजी कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. १७ मार्च रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भिरा येथे ४२ आणि सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे १७ अंश नोंदविण्यात आले असून, कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, बुधवारसह गुरुवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २२ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.