Join us

येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण हाेणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:06 IST

कृष्णानंद होसाळीकर; ८ जुलैनंतर पुनरागमनाची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांत गडगडाटासह होणाऱ्या पावसामुळे राज्यात थोडा ...

कृष्णानंद होसाळीकर; ८ जुलैनंतर पुनरागमनाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांत गडगडाटासह होणाऱ्या पावसामुळे राज्यात थोडा दिलासा मिळाला; पण येत्या आठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी हाेणार असण्याची शक्यता आहे. ८, ९ जुलैनंतरच पावसाच्या पुनरागमनाची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते दक्षिण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. १ जुलै रोजी कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईतही पावसाचे वातावरण असेच राहणार असून, बुधवारीही सकाळी आणि सायंकाळी काही काळ पावसाच्या किंचित सरी कोसळल्या.

....................................................