Join us

ऑक्टोबर हीटमध्ये पावसाचा धक्का

By admin | Updated: October 25, 2014 21:59 IST

ऑक्टोबर हिटमध्ये पावसाच्या आल्हाददायक धक्याने रायगडकर सुखावले असले तरी या पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

अलिबाग : ऑक्टोबर हिटमध्ये पावसाच्या आल्हाददायक धक्याने रायगडकर सुखावले असले तरी या पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. अलिबाग, रोहे, मुरुड, माणगाव आणि महाड येथे पावसाने हजेरी लावली.
शनिवारी पहाटे पाऊस पडल्याने सकाळपासूनच वातावरणात कमालीचा गारवा आला होता. ढगाळ वातावरणामुळे सुर्याची तळपती किरणो झाकोळली गेली. ऑक्टोबर हिटमुळे पारा चांगलाच चढल्याने वातावरणात प्रचंड उष्णता वाढली, त्यामुळे नागरीक गर्मीने हैराण झाले होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. वातावरणात गारवा कधी येतो, याची वाट पाहत असतानाच पावसाच्या अचानक येण्याने काही काळ तरी दिलासा मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, रोहे, मुरुड, माणगाव यासह अन्य तालुक्यांमध्ये पावसाचे थेंब पडले. प्रचंड उष्णतेत अचानक निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि पावसाचा विपरीत परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे. अद्याप भात कापणीला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. पिक शेतामध्ये तयार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. आधीच शेतीचा व्यवयाय महागला असून त्यातच निसर्गाने आक्रोश केला तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल अशी 
भिती शेतक:यांना सतावत आहे. (प्रतिनिधी)
 
पावसाचा शिडकावा
4रेवदंडा- गेले दोन दिवस ढगाळ हवामान झाल्याने आज रेवदंडा परिसरात पावसाचा शिडकावा दिवसभर सुरूच होता. थंडगार वारे सुटल्याने मच्छिमारी नौका किना:यावर थंडावल्या होत्या. भात कापणी सुरू केलेले शेतकरी चिंतेत पडले आहेत. 
4भातशेती कापायला सुरूवात केली असल्याने शेतकरी पाण्यात भातशेती गेल्याने त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीत शेतकरी राजावर ही आपत्ती कोसळली आहे.