Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस स्थिरावला; श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक ७३ मि.मी.

By admin | Updated: June 15, 2015 22:28 IST

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस स्थिरावला असून सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ६८८.३० मि.मी. पाऊस पडला

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस स्थिरावला असून सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ६८८.३० मि.मी. पाऊस पडला असून ७३ मि.मी. अशी सर्वाधिक पावसाची नोंद श्रीवर्धन येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनअखेर अलिबाग ५९, पेण ३६.४०, मुरुड ५१, पनवेल ६७, उरण ३१, कर्जत ५४.९०, खालापूर ६९, माणगांव १७, रोहा ३९, सुधागड २३, तळा २३, महाड १८, पोलादपूर २७, म्हसळा ४९ आणि गिरीस्थान माथेरान येथे ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी १५ जुलै २०१४ रोजी जिल्ह्यात एकूण पर्जन्यमान ३४८.४० मि.मी. होते तर सरासरी पर्जन्यमान २१.९१ मि.मी. होते. यंदा १५ जून २०१५ रोजी हे पर्जन्यमान ६८८.३० मि.मी.वर पोहोचले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान वृद्धिंगत होऊन ४३.०२ मि.मी.वर पोहोचले आहे.१५ जून २०१५ अखेर जिल्ह्यात एकूण १ हजार ६७४ मि.मी. पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान १०४.६६ मि.मी. आहे. अपेक्षित एकूण सरासरी पर्जन्यमानापैकी ३.४७ टक्के पर्जन्यमान यंदा आतापर्यंत झाले आहे. (विशेष प्रतिनिधी)