Join us  

बाप्पा पावलो! गणेशोत्सवासाठी कोकणात आजपासून धावणार १६२ विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:14 AM

आरक्षण उपलब्ध; राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला हिरवा कंदील

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणातील रेल्वे प्रवासाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे धावणार असल्याची घोषणा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद असल्याने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यामध्ये पावसाचा अडसर आहे. त्यामुळे रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. राज्य सरकारने ती मान्य केली. त्यानुसार, १५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार असून जवळपास १६२ हून अधिक विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ८१ अप तर ८१ डाऊन गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण १५ आॅगस्टपासून आरक्षण केंद्रावर आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.पश्चिम रेल्वे चालवणार पाच विशेष रेल्वेगणेशोत्सव काळात कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून १९ ते २६ आॅगस्ट दरम्यान पाच विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या २० फेºया होतील.फेºयामुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड (बुधवार) ४ २३.५५मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड (सोमवार) ४ २३.५५वांद्रे टर्मिनस सावंतवाडी रोड (मंगळवार) ४ २३.४५वांद्रे टर्मिनस सावंतवाडी रोड (रविवार) ४ २३.४५वांद्रे टर्मिनन्स-कुडाळ (गुरुवार) ४ १५.००कोरोना चाचणी अनिवार्य असल्याने एसटीकडे पाठराज्य सरकारकडून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांसाठी एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. परंतु गुरुवार १३ आॅगस्टपासून जे नागरिक कोकणात जाणार आहेत त्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्यांना प्रवासाची परवानगी आहे. पण गुरुवारी आणि शुक्रवारी जाण्यासाठी प्रवासी आलेच नाहीत. त्यामुळे एकही बस सुटू शकली नाही.१५ ते २२ आॅगस्टदरम्यान सुटणाºया गाड्यासीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी स्पेशल १६ २३.०५एलटीटी-कुडाळ-एलटीटी स्पेशल १६ २३.५०सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी स्पेशल १६ २२.००एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी स्पेशल १६ ८.३३२५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सुटणाºया गाड्यासीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी स्पेशल २४ ७.१०सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी स्पेशल २४ ५.५०एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी स्पेशल २६ ५.३०एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी स्पेशल २४ ११.५५

टॅग्स :कोकण रेल्वेगणेशोत्सव