Join us  

यार्ड रीमॉडेलिंगच्या कामामुळे रेल्वे गाड्या रद्द

By सचिन लुंगसे | Published: April 10, 2024 8:00 PM

ट्रेन क्रमांक ११११३ देवलाली - भुसावळ मेमू एक्स्प्रेस १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे.

मुंबई: मध्य रेल्वेने १४ ते १६ एप्रिल या कालावधीत जळगाव - मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या संदर्भात चाळीसगाव यार्ड रीमॉडेलिंगसाठी ब्लॉक घेतला असून, याचा रेल्वेच्या कामकाजावर होणारा परिणाम होणार आहे. त्यानुसार, काही गाडयांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. काही गाडयांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेन क्रमांक ११११३ देवलाली - भुसावळ मेमू एक्स्प्रेस १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ११११४ भुसावळ - देवलाली मेमू एक्स्प्रेस १४ एप्रिल आणि १५ एप्रिल रोजी रद्द, ट्रेन क्रमांक १११२० भुसावळ - इगतपुरी मेमू एक्स्प्रेस १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी रद्द, ट्रेन क्रमांक ११११९ इगतपुरी - भुसावळ मेमू एक्स्प्रेस १६ एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी रद्द, ट्रेन क्रमांक ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - धुळे एक्स्प्रेस १४ एप्रिल आणि १५ एप्रिल रोजी रद्द, ट्रेन क्रमांक ११०१२ धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी रद्द, ट्रेन ०१२११ आणि ०१२१२ बडनेरा-नाशिक विशेष १४ एप्रिल, १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी रद्द, ट्रेन क्रमांक ०१३०४ आणि ०१३०७ धुळे-चाळीसगाव  मेमू प्रवासी गाडी १६ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबईरेल्वे