Join us  

मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 7:32 AM

मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. स्लीपर बदलायला उशीर झाल्यानं वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, दि. 23 - मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. स्लीपर बदलायला उशीर झाल्यानं वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बोईसर, डहाणू, वापीला जाणा-या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे. गुजरातकडे जाणारी वाहतूक दीड तास उशीरानं सुरू आहे.  पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाच्या 118 नंबर वरील भागात देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी (22 सप्टेंबर) उशिरा रात्री 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेने (डाऊन)जाणाऱ्या रेल्वे रुळाचे व स्लीपरचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम वेळीच पूर्ण न झाल्याने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅकवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झाल्या आहेत. या खोळंब्यामुळे गुजरातला जाणाऱ्या गाड्या दीड ते दोन तास उशीरानं धावत आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

सफाळे-वैतरणा दरम्यान रेल्वे ट्रॅकचे खराब स्लीपर बदलण्याचे काम शुक्रवारी (23 सप्टेंबर)रात्रीपासून सुरू आहे. या कामास विलंब झाल्याने मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या एक्स्प्रेसची सेवा बंद झाली आहे. तर मुंबईला येणाऱ्या गाड्या एक तास उशीराने धावत असल्याने लांबचा प्रवास करणारे चाकरमानी प्रचंड वैतागले आहेत. 

डाउन ट्रॅकवरुन पालघर, बोइसर, डहाणू, वापी, नवसारीकडे जाणाऱ्या गाड्या बंद असल्याने तिथल्या कंपन्यांमध्ये कामावर जाणारे चाकरमानी कामावर पोहोचू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, सफाळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळीच मनस्ताप सहन करावा लागल्याने प्रवासी प्रचंड संतापले आहेत.  

टॅग्स :पश्चिम रेल्वे