Join us

कसालमध्ये रेल्वे स्थानकाची मागणी

By admin | Updated: March 4, 2015 23:41 IST

ग्रामसभा ठरावात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ग्रामपंचायतीने निवेदन देऊन रेल्वे स्थानक होण्याची मागणी

ओरोस : कसाल हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. तेथे रेल्वेस्थानक नाही. मात्र, कसाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ रेल्वेने मोठ्या प्रमाणात मुंबई, गोवा, पुणे येथे जात असतात. सोमवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ग्रामपंचायतीने निवेदन देऊन रेल्वे स्थानक होण्याची मागणी केली आहे. कसालमध्ये १० ते १५ किलोमीटरच्या आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, गोवा येथे जाण्यासाठी एसटी स्थानकावर येत असतात. मागील काही वर्षांपासून या गावात रेल्वे स्थानक व्हावे, अशी सर्व ग्रामस्थांची मागणी असल्यामुळे सोमवारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. त्या अनुषंगाने सुरेश प्रभू यांना निवेदन देऊन पाठपुरावा करावा, असेही या ठरावात मागणी केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक झाले, तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल. हा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी माजी सरपंच मधुकर कसालकर, रमेश कसालकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)