Join us

वैष्णोदेवीला जायचं आहे, पण बुकिंग केलं का?; मुंबईकरांसाठी स्पेशल ट्रेन

By सचिन लुंगसे | Updated: April 13, 2024 18:28 IST

वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटरा एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी वांद्रे टर्मिनस येथून २१:५० वाजता सुटेल.

मुंबई : पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष भाडे असलेल्या रेल्वे गाड्या चालविल्या जाणार आहेत. यात ०९०९७/०९०९८ वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटरा एसी सुपरफास्ट स्पेशल साप्ताहिकच्या २२ फेऱ्यांचा समावेश आहे.०९०९७ वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटरा एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी वांद्रे टर्मिनस येथून २१:५० वाजता सुटेल. मंगळवारी १० वाजता कटरा येथे पोहोचेल. ही रेल्वे गाडी २१ एप्रिल ते ३० जूनदरम्यान चालविली जाईल. ०९०९८ वैष्णोदेवी कटरा-वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक मंगळवारी कटरा येथून २१:४० वाजता सुटेल. गुरुवारी १०:१० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी २३ एप्रिल ते २ जुलैपर्यंत चालविली जाईल. रेल्वे गाड्या दोन्ही दिशांना बोरीवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, मथुरा, दिल्ली सफदरजंग, अंबाला कैंट, ढंडारी कला, जालंधर कैंट, पठाणकोट आणि जम्मू तवी स्थानकांवर थांबतील.

टॅग्स :मुंबई