Join us  

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची रेल्वे स्थानकाला सरप्राईज भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 6:58 AM

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी शुक्रवारी रात्री मुंबईतील रेल्वे स्थानकाना सरप्राईज भेट दिली.

मुंबई : रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी शुक्रवारी रात्री मुंबईतील रेल्वे स्थानकाना सरप्राईज भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि लोकमतचे संपादकीय सल्लागार समीर झवेरी होते. कोणत्याही स्वरूपाचा व्हीआयपी ताफा रेल्वे मंत्री यांच्या सोबत नव्हता. एल्फिन्स्टन भेटी नंतर प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत विश्राम करत आहेत. 

शुक्रवारी रात्री उशीरा त्यांनी चर्चगेट स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर स्थानकाला त्यांनी  सरप्राईज भेट दिली.  रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या  सरप्राईज भेटीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची मात्र नक्कीच झोप उडाली असेल. स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न,  रेल्वे स्थानकातील अस्वछता यांचा ग्राउंड रिपोर्ट प्रत्यक्ष भेटीतून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतला. 

मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पीयूष गोयल एलफिन्स्टन पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सध्या मुंबईत आले होते. 27 नोव्हेंबर रोजी एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

टॅग्स :पीयुष गोयल