Join us

मुंबईत १ जानेवारीपासून धावणार एसी लोकल, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 06:44 IST

नवी दिल्ली : मुंबईतील उपनगरी रेल्वेवर ‘एसी’ लोकलची सेवा येत्या १ जानेवारीपासून सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी येथे केल्याने मुंबईकरांना अशा आरामदायी प्रवासाचे गेले वर्षभर दाखविले गेलेले स्वप्न प्रत्यक्ष साकार होणार आहे.

नवी दिल्ली : मुंबईतील उपनगरी रेल्वेवर ‘एसी’ लोकलची सेवा येत्या १ जानेवारीपासून सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी येथे केल्याने मुंबईकरांना अशा आरामदायी प्रवासाचे गेले वर्षभर दाखविले गेलेले स्वप्न प्रत्यक्ष साकार होणार आहे.‘एसी’ लोकलच्या चाचण्या पूर्ण व यशस्वी झाल्या असून, त्यांच्या प्रवासी सेवा येत्या नववर्षदिनापासून सुरू केल्या जातील, असे गोयल यांनी पत्रकारांना सांगितले.रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले की, सुरुवातीस १ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एका ‘एसी’ लोकलच्या दिवसभरात सात फेºया सुरू केल्या जातील.अधिकाºयांनी असेही सांगितले की, मध्य व पश्चिम या दोन्ही उपनगरी रेल्वेंवर ‘एसी’ लोकल सुरू करता याव्यात यासाठी रेल्वेने अशा गाड्यांचे नऊ जादा ‘एसी ईएमयू रेक्स’ याआधीच खरेदी केले आहेत. टप्प्याटप्प्याने या सर्व नऊ गाड्या वापरून दोन्ही रेल्वेंवर ‘एसी’ लोकलच्या फेºया सुरू केल्या जातील. अशा पहिल्या सेवेचा शुभारंभ १ जानेवारीस पश्चिम रेल्वेवर केला जाईल.रेल्वेमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत अशीही माहिती देण्यात आली की, या ‘एसी’ लोकलचे भाडे दिल्लीतील मेट्रोच्या धर्तीवर किंवा मुंबईतील सध्याच्या प्रथम वर्गाच्या भाड्याच्या दीडपट असेल.रेल्वे मंडळाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद म्हणाले की, भाडे आकारणी करून १ जानेवारीपासून ‘एसी’ लोकलच्या पहिल्या फेºया सुरू केल्या जातील. ही केवळ सुरुवात असेल. कालांतराने या फेºया वाढविल्या जातील.खरंतर, पहिली ‘एसी’ लोकल याच महिन्यापासून सुरू करायची होती. पण काही कार्यात्मक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. आता रेल्वे मंडळाच्या पातळीवर त्या अडचणी दूर करण्यात आल्या असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.‘रिसर्च डिझाईन अ‍ॅँड स्टॅँडर्ड आॅर्गनायझेशन’चे (आरडीएसओ) वेगाबाबतचे प्रमाणपत्र येत्या काही दिवसांत मिळेल. त्यानंतर एसी लोकलपुढील पश्चिम रेल्वेवर मुंबईतील प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.>चर्चगेट ते विरारपर्यंत २७०० सीसीटीव्हीउपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत असून चर्चगेट ते विरारपर्यंतच्या पट्ट्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर एकूण २७०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तब्बल ११४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीतील चित्रण स्थानिक पोलीस ठाण्यातही दिसेल, अशी व्यवस्था करण्याचाही निर्णय झाला आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वे प्रवासी