Join us  

मध्य, हार्बर मार्गावर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक, कुर्ला ते वाशी लोकल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 7:02 AM

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण दिशेकडे जाणाऱ्या ठाणे ते कल्याण धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळी मुलुंडहून सुटणाऱ्या धिम्या लोकल कल्याण स्थानकापर्यंत जलद मार्गावरून चालविण्यात येतील. या लोकलला नियोजित थांब्याव्यतिरिक्त ठाणे, दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवरही थांबा देण्यात येईल.ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दोन्ही दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. रविवारी सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून वाशी/ बेलापूर/ पनवेल स्थानकासाठी सुटणारी लोकल सेवा ब्लॉक काळात रद्द करण्यात आली आहे. याचप्रमाणे सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही.कल्याण स्थानकावरील पुलाचे तोडकामरविवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल आपल्या निश्चित थांब्यांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. तर, सकाळी १० वाजून ५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल नियोजित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवरही थांबतील. या ब्लॉकदरम्यान कल्याण स्थानकावरील कसारा दिशेकडील पादचारी पुलाचे तोडकाम करण्यात येणार आहे. 

टॅग्स :मुंबई लोकल