Join us  

रेल्वे प्रवासी वाढले; पण वेळेचा संभ्रम कायम! प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 8:05 AM

Mumbai Suburban Railway : काेराेना संसर्गाच्या भीतीने मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू झाली. पहिल्या दिवशी लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला.

मुंबई -  काेराेना संसर्गाच्या भीतीने मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू झाली. पहिल्या दिवशी लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी गर्दी वाढली. परंतु वेळेचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.सर्वसामान्य प्रवासी तीन टप्प्यांत रेल्वे प्रवास करू शकतात. रेल्वे सेवा सुरू होण्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते शेवटच्या लाेकलपर्यंत प्रवासास मुभा आहे. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला सकाळी ७ ते दुपारी १२ ते दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी नाही. रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी ही व्यवस्था केली आहे.मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले, सर्वांसाठी लोकलच्या पहिल्या दिवशी काही लिफ्ट, एस्कलेटरही बंद होते. त्यामुळे गर्दी कमी होती. मात्र, मंगळवारी या सुविधा सुरू आहेत. कालच्या तुलनेत प्रवासी वाढले आहेत. येत्या काही दिवसांत प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल. 

वेळेवरून हाेतात वादमी आज दादर ते ग्रँट राेड प्रवास केला. तिकीट काढायला अडचणी येत आहेत. अजून वेळेबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. यूटीसी ॲप ठरावीक वेळेत लॉक होते. पण, तिकीट काढायला लोक गर्दी करीत आहेत. वेळेवरून वाद होत आहेत.- योगेश खेमकर, रेल्वे प्रवासी वेळेचे पालन हाेत नाहीअत्यावश्यक आणि सामान्य प्रवासी यांच्यासाठी ठरावीक वेळा आहेत. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. कळवा स्थानकात फर्स्ट क्लास डबे रिकामे होते तर सेकंड क्लासमध्ये खूप गर्दी होती. तिकीट काउंटरवर आयडी विचारला जातो, पण ज्यांनी पास काढले आहेत ते बिनधास्त प्रवास करीत आहेत. काही स्थानकांत तर आयडीही तपासले जात नाहीत.- सिद्धेश देसाई, रेल्वे प्रवासी.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमुंबई