Join us  

मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये लागणार सीसीटीव्ही, २७६ कोटींच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 9:53 PM

मध्य रेल्वेच्या १५५ रेक मध्ये ११ हजार १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. २०१८ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकलमधून ३५ लाखांहून अधिक प्रवास करणा-यांसाठी रेल्वे बोर्डाने सुखद  मंजूरी  दिली आहे. मध्य रेल्वेने सर्व लोकल बोगीत सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डात पाठवला होता. सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणेचा समावेश असलेल्या २७६ कोटींचा प्रस्ताव बुधवारी बोर्डाने मंजूर केला. यानूसार मध्य रेल्वेच्या १५५ रेक मध्ये ११ हजार १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. २०१८ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के.जैन यांनी दिली.मध्य रेल्वेवर १५५ रेकच्या माध्यमाने तिन्ही मार्गावर रोज एकूण १७०६ फे-या होतात. यात मुख्य मार्गावर ८५६ फे-या, हार्बर मार्गावर ६०४ फे-या आणि ट्रान्स हार्बरवर २४६ फे-यांचा समावेश आहे. लोकल मधील महिला प्रवाशांच्या नियंत्रणासाठी महिला बोगीत टॉक बॅक यंत्रणा देखील कार्यान्वित होणार आहे. सर्व रेकमध्ये प्रथम आणि द्वितीय दर्जाच्या महिला बोगीत एकूण ११०६ टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. टॉकबॅक यंत्रणेमुळे महिला प्रवाशांवर आपत्कालीन परिस्थितीत गार्ड अथवा मोटारमनसोबत संपर्क साधता येणार आहे. यामुळे संकटात असणा-या महिला प्रवाशांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.सुरुवातीला महिला बोगीत सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय विचाराधीन होता. मात्र महिला बोगींसह साधारण बोगीत देखील सीसीटीव्हींचा ह्यवॉचह्ण असणार आहे. एका बोगीत साधारणपणे ६ सीसीटीव्ही यांनूसार एका रेकमध्ये ७२ सीसीटीव्ही कार्यान्वित होतील.  फेस रिडर सीसीटीव्ही साठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवाय सीसीटीव्हींचे रेकॉर्डिंग जतन करण्यासाठी विशिष्ट डाटा बँक तयार करण्यात येईल, अशी माहिती जैन यांनी दिली.मध्य रेल्वेवर भविष्यात एसी लोकल पण...उपनगरीय लोकल प्रवाशांच्या आरमादायक प्रवासासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह सकारात्मक चर्चा झाली. सध्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागतो. यामुळे अपघात होतात. यावर उपाय म्हणून लवकरच बंद दरवाजे असणा-या लोकल सुरु करण्यात येणार आहे. दरवाजे बंद केल्यानंतर वातानुकूलित यंत्रणा अत्यावश्यक आहे. परिणामी भविष्यात मध्य रेल्वेवर देखील एसी लोकल धावतील. सध्या तरी केव्हा,कधी आणि कोणत्या मार्गावर सुरु होतील, हे निश्चित झालेले नाही. मध्य रेल्वेचे  मिशन २०१८ एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर हायपॉवर समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालात उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे दिसून आले. ही उणीव भरुन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. रेल्वे मंत्रालयाकडून ह्यसुरक्षितता निधीह्ण मंजूर झाल्यामुळे कामांना गती मिळेल. परिणामी २०१८ मध्ये पादचारी पूल, लिफ्ट, सरकते जिने यांसह फलाट रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी  २०१८ डिसेंबर  डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.- पादचारी पूल - यंदा १३ पादचारी पूल मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार आहे. गेल्यावर्षी १२ पादचारी पूल उभारण्यात आले. परिणामी पादचारी पूलांच्या एकूण संख्या २५ होईल.- सरकते जिने- प्रत्येक स्थानकांवर प्रत्येकी दोन सरकते जिने बसवण्यात येतील. ३१ मार्च पर्यंत एकूण ५२ सरकते जिने कार्यान्वित होतील.- अपघात रोखण्यासाठी - अपघात रोखण्यासाठी रेल्वे रुळांशेजारी ३६ किमी लांबीची भिंत उभारण्यात येणार आहे.- फलाट रुंदीकरण- वर्षाअखेरीस एकूण ३६ फलाटांचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी ३१ फलाटांचे रुंदीकरण पूर्ण झाले.- वैद्यकिय कक्ष- एप्रिल २०१८ पर्यंत १४ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकिय कक्ष उभारण्यात येतील. एकूण २४ स्थानकांचे लक्ष मध्य रेल्वेने ठेवण्यात आले आहे.- इंडिकेटर्स - मध्य रेल्वेवर ३०० नवीन लोकल वेळा दर्शवणारे इंडिकेटर बसवण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकलमध्य रेल्वेमुंबईसीसीटीव्ही