Join us  

रेल्वे प्रशासन मान्सूनच्या तयारीत सपशेल नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:44 AM

तुरळक सरी पडल्यावर मध्य रेल्वेमार्गावरील लोकल सेवा खंडित

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा अविभाज्य भाग असलेली लोकलसेवा यंदाच्या सुरूवातीच्याच पावसात नापास झाल्याचे दिसून आले. तुरळक सरी पडल्यावर मध्य रेल्वेमार्गावरील लोकल सेवा खंडित झाली. चर्चगेट येथे होर्डिंग पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. गॅ्रण्ट रोड, तुर्भे स्थानकावर आगीच्या घटना घडल्या. पादचारी पुलाची अर्धवट कामे, पत्र्याच्या शेड उभारणीत दिरंगाई, नालेसफाईची रेंगाळलेली कामे, रेल्वे रुळाची उंची वाढवणे, ओव्हरहेड वायरची दुरूस्ती अशी कामे अजून अपूर्ण आहेत. अशा अपूर्ण कामांमुळेच दरवर्षी रेल्वे रुळांवर पाणी साचणे, पत्र्याच्या शेडअभावी एका ठिकाणी गर्दी एकवटणे, ओव्हरहेड वायर नादुरुस्त होऊन तांत्रिक बिघाड होणे अशा घटना घडतात. त्याचा अनुभव सुरूवातीलाच आल्याने रेल्वे प्रशासन मान्सूनच्या तयारीत सपशेल नापास झाल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या व्यासपीठावर व्यक्त केली.रेल्वे प्रशासन, राज्य सरकार व स्थानिक संस्थांचे सहकार्य महत्त्वाचेरेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये परिस्थितीनुसार कोणतीही वाढ झालेली नसताना उपनगरी लोकल फेऱ्या व काही नव्या मेल-एक्स्प्रेस प्रशासनाने वाढविल्या आहेत. परिणामी रेल्वे वाहतुकीचा लहान अडथळाही तीव्र स्वरूप धारण करतो. या पावसाळ्यात रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे. १) दरवर्षी ज्या ठिकाणी पाणी तुंबते तेथे जादा अश्वशक्तीचे पंप बसवून कार्यक्षम माणसे तैनात करावीत. २) हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून (संडे शेड्यूल) लोकल फेºया कमी करू नयेत. कल्याण-मुंबई या चार मार्गिका असलेल्या विभागात अडथळा आल्यास वाहतूक जलद अथवा धिम्या मार्गावर वळविण्यात प्रमाणाबाहेर विलंब करू नये. ३) मुंबई-कल्याण विभागात वाहतूक खंडित झाली तरीही कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवावी. यासाठी कर्जत-कसारा मार्गासाठी जादा राखीव लोकल उपलब्ध ठेवाव्यात. ४) गोंधळाच्या स्थितीत वस्तुनिष्ठ उद्घोषणा सर्व स्टेशनवर सातत्याने सुरू ठेवाव्यात. ५) रेल्वे प्रशासनाने राज्य शासन व स्थानिक संस्थांशी योग्य समन्वय साधून व परस्पर सहकार्याने नैसर्गिक आपत्तीत प्रवाशांच्या सुखकर प्रवासाची काळजी घ्यायलाच हवी.- मनोहर शेलार, मा. सदस्य उपनगरी रेल्वे सल्लागार, मध्य रेल्वेरेल्वे रूळ, पुलाच्या तपासणीकडे लक्ष हवेपावसाळ्यात होणाºया गैरसोयीचा विचार करता, प्रवाशांची काळजी घेणे ही रेल्वे प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी सक्षम यंत्रणा तैनात करावी. रेल्वे स्थानकासह लोकलमधील गर्दीचे नियंत्रण कशाप्रकारे करता येईल, यावर प्रशासनाने काम केले पाहिजे. रेल्वे रुळाची तपासणी, पुलाची तपासणी या बाबीकडे लक्ष द्यावे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे हाल थांबवून प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यावर भर दिला पाहिजे.- मयूरी विचारे, गोरेगावविलंबाचे शुक्लकाष्ठ संपेनामुंबईची लाइफलाइन असलेल्या उपनगरीय मार्गावरील प्रवाशांचे विलंबकाष्ठ संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. रोज उठून तांत्रिक कारणे देत होणारा खोळंबा आज प्रवाशांना असह्य झालेला आहे. त्यांत खोळंबा किंवा लोकल विलंब याबाबत योग्य उद्घोषणा स्थानकात होत नसल्याने प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दर आठवड्याला मेगाब्लॉक घेऊन समस्या सुटत नाहीत का? अनेक वेळा मेगाब्लॉक घेऊनही परिस्थितीत योग्य बदल होताना दिसत नाही, हे दुर्दैव. दैनंदिन लोकल प्रवास चांगला सुरक्षित व्हावा अशी चाकरमानी आणि प्रवाशांची साधी अपेक्षा पूर्ण होत नाही. पण त्या त्या वेळी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु मानसिक यातना भोगाव्या लागतात. यावर गंभीरपणे विचार व्हावा. त्यासाठी राजकीय दबाव, प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा झाला तरच रेल्वेचा उत्तम आणि सुरक्षित प्रवास घडू शकतो.- कमलाकर जाधव, बोरीवली पूर्वनाल्यांची दररोज सफाई करामुंबई उपनगरीय प्रवाशांची लोकल ही ‘लाइफलाइन’ आहे. पण तुरळक पाऊस पडल्यावर देखील लाइफलाइन ठप्प होते. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने, विद्युत पुरवठा खंडित होणे, पावसामुळे होणारे अपघात मान्सूनमध्ये नित्याचे झाले आहेत. पावसाळ्यात जादा लोकल चालविणे आवश्यक आहे. रुळावर पाणी साचल्यास हे पाणी आधुनिक पंपाद्वारे पाण्याचा उपसा करणे आवश्यक आहे. रेल्वे रूळ परिसर आणि नाल्यांची सफाई दररोज करणे आवश्यक आहे. पादचारी पुलांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून गर्दीचे प्रमाण कमी होईल. महिला विशेष लोकलची वाढ करणे आवश्यक आहे.- नितीन पगारे, धारावीशेडची कामे पूर्ण करा!मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवरील पादचारी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पादचारी पूल बंद केल्याने ऐन पावसाळ्यात एका फलाटावरून दुसºया फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. पावसाळ्यात स्थानकावर गर्दीचे प्रमाण वाढते. त्यामुळे पुन्हा एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पत्र्याची शेड, गर्दीचे व्यवस्थापन, रेल्वे रुळ सफाई अशी प्राथमिक कामे करणे आवश्यक आहे. स्थानकात फेरीवाले दिवसेंदिवस वाढत आहेत, यावर लगाम घालणे आवश्यक आहे. ग्रॅण्ट रोड स्थानकावर फलाट क्रमांक एक व दोनवरील पूल मागील एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून चालणे कठीण होत आहे. या पुलाचे काम सुरू असताना नुकतीच आग लागण्याची घटना घडली. प्रशासन निष्काळजीपणे काम करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. रेल्वे प्रशासन अशीच कामे करत राहले तर, मुंबईकरांचे जीव जाणे थांबणार नाही.- प्रतीक गजरे, ग्रॅण्ट रोड...तरच पावसातही लोकल धावतील वेळेवरअनेकदा थोडा जरी पाऊस झाला तरी रेल्वे सेवा विस्कळीत होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रत्यक्षात रेल्वे प्रशासनाने सर्व तांत्रिक कामे युद्धपातळीवर वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी साचणाºया संभाव्य ठिकाणी त्याचा निचरा होण्याची यंत्रणा कार्यान्वित करणे, पावसात लोकल रुळावरून धावताना येणारे सर्व तांत्रिक अडथळे दूर करणे याकडे लक्ष दिल्यास पावसातही लोकल नियोजित वेळापत्रकानुसार धावणे शक्य होईल व प्रवाशांना दिलासा मिळेल.- मोरे काका, समाधान अभियान, नेरळरेल्वे प्रशासनाने सजग राहावे!उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण रेल्वे प्रशासन, रेल्वे अधिकाऱ्यांची असते. प्रत्येक अधिकाºयाच्या कार्यक्षेत्रात येणाºया समस्यांवर लक्ष दिले पाहिजे. यावर तोडगा काढून ही समस्या मिटविणे अधिकाºयांचे काम आहे. रेल्वेने नियोजनबद्ध कामे करून टप्प्याटप्प्याने कामे केली पाहिजेत. पावसाळा सुरू होताच चर्चगेट स्थानकाजवळ होर्डिंग पडून एका प्रवाशाचा जीव गेला, तर दोन प्रवासी जखमी झाले. अजून पुढील तीन महिन्यांत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे किती जीव जातील ? प्रशासनाने सजग राहून प्रवाशांच्या समस्या सोडविणे आवश्यक आहे.- प्रकाश साटम, बोरीवलीआपत्कालीन सेवेची पूर्तता करावीपावसाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात रेल्वेचे आर्थिक नुकसान होण्यासह प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे रेल्वेने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चांगली तयारी केली पाहिजे. विशेष म्हणजे पावसाळ्यात लोकल सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वेमार्गावरील धोकादायक ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक तैनात ठेवले पाहिजेत. मुसळधार पावसात रेल्वे मार्गावर दृश्यमानता कमी झाल्यास मोटरमनला (रेल्वे गाडी चालक) गाडीचा वेग कमी करण्याचा आदेश दिला पाहिजे. अतिदक्षता म्हणून प्रत्येक स्टेशनबाहेर एक अग्निशमक दलाची गाडी आणि रुग्णवाहिका असली पाहिजे.- श्वेता टेंभुर्णे, कल्याण पूर्ववेळेवर दुरुस्तीची कामे करावीत!मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवरील पत्र्याची शेड लावण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे प्रवाशांना भिजत उभे राहावे लागते. तर अनेक प्रवासी जिथे पत्र्याची शेड आहे अशा ठिकाणी उभे राहतात. त्यामुळे एका ठिकाणी जास्त गर्दी जमते. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पत्र्याच्या शेडचे काम लवकरात लवकर केले पाहिजे. पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना अनेक ठिकाणी होतात. त्यामुळे पावसाळ्यात प्रत्येक स्थानकावर जादा पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आले पाहिजेत. नाल्याची साफसफाई केली पाहिजे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चर्चगेटची दुर्घटना घडली. मागील वर्षी अंधेरी येथील गोखले पुलाची दुर्घटना झाली. त्यामुळे पूल दुर्घटना होऊ नये, यासाठी पुलाचे वेळच्यावेळी आॅडिट झाले पाहिजे. तसेच त्यांचीवेळेवर दुरुस्ती केली पाहिजे. कुर्ला ते विद्याविहार आणि कुर्ला ते टिळकनगर रेल्वे मार्गात गवत व लहान झुडपांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात ही झुडपे व गवत काढले पाहिजे.- स्वप्निल जवळगेकर, कुर्लाप्लॅस्टिक पॅकेटमधील खाद्यपदार्थ विक्रीस बंदी हवीदरवर्षी पूर्व उपनगरीय भागातील रेल्वे मार्गावर पाणी साचण्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी जादा पंप बसविणे आवश्यक आहे. परळ, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, नाहूर या रेल्वे स्थानकांजवळील नालेसफाई केली पाहिजे. खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिकच्या पुड्यांमुळे नाल्यामध्ये कचरा साचतो. त्यामुळे प्रथम रेल्वे स्थानकातील दुकानांमध्ये प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये असलेले खाद्यपदार्थ विक्रीस बंदी आणणे आवश्यक आहे.- अतिश कसबे, विक्रोळी

टॅग्स :पाऊसलोकल