Join us

रेल्वेचा आज मेगाब्लॉक

By admin | Updated: July 11, 2015 23:01 IST

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप धीम्या मार्गासह हार्बरच्या गुरुतेजबहादूरनगर (जीटीबीएन) - मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप धीम्या मार्गासह हार्बरच्या गुरुतेजबहादूरनगर (जीटीबीएन) - मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ते अनुक्रमे स. ११.१५ ते दु. ३.१५ तसेच स. ११ ते दु. ३ या वेळेत घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे माटुंगा-मुलुंड अप धीम्या मार्गावरील वाहतूक जलदवर वळविण्यात येणार आहे. ठाणे स्थानकानंतर ती वळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. फलाटांअभावी नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांमध्ये या कालावधीत लोकल उपलब्ध नसतील. माटुंगानंतर पुन्हा त्या लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ज्या स्थानकांमध्ये लोकल नसतील, तेथील प्रवाशांना मुलुंड, भांडुप, कुर्ला स्थानकांतून प्रवासाची मुभा दिल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. हार्बरच्या ब्लॉकमुळे पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सीएसटीसाठी अप/डाऊनच्या लोकल त्या कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मानखुर्द-वाशी/ बेलापूर/ पनवेल मार्गांवर विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना ट्रान्स-हार्बर तसेच मुख्य मार्गावरून स. ११ ते. ४ या वेळेत प्रवासाची मुभा असेल, असेही स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)