ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - कुर्ला - विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने येणा-या अप मार्गावरील गाड्यांवर झाला आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या असून मध्य रेल्वेची एकूणच वाहतूक कोलमडली आहे.
बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेवरील गाडयांच्या या गोंधळामुळे स्थानकांवर व गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.