Join us

राजपत्रित अधिकारी महासंघाची रायगड समन्वय समिती गठीत

By admin | Updated: June 18, 2015 00:48 IST

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या रायगड जिल्हा समन्वय समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल

अलिबाग : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या रायगड जिल्हा समन्वय समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. राजपत्रित अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत व न्याय्य मागण्यांसाठी समिती त्यांच्या पाठीशी राहील. महासंघ अधिक बळकट करून दर महिन्याला कार्यकारिणीची सभा घेण्यात येईल, असे समन्वय समितीचे कार्याध्यक्ष तथा निवासी उप जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी सांगितले.सभेत नवीन कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्ष म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, सरचिटणीस म्हणून पंचायत समिती उरणचे पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. जी. जाधव, उपाध्यक्ष म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल सिद्धेश्वर घुले, चौकचे पशुधन विकास अधिकारी डॉ. बळीराम इनकर, प्राथमिक आरोग्य केंद्र लोहपचे डॉ. आर. जी. राठोड, अलिबागचे तहसीलदार प्रकाश सपकाळ, जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश गावडे, कृषी विभागाचे उपसंचालक राजाराम मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. बी. विडेकर, पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. बी. भोये यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी आर. टी. लाकुडझोडे, सहसचिव म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल आहेर यांची निवड करण्यात आली.