जयंत धुळप, अलिबागमहाराष्ट्राच्या ‘स्वच्छ भारत आणि समृद्ध भारत’ याकरिता स्फूर्ती देत ज्येष्ठ निरुपणकार व राज्य शासन नियुक्त ‘स्वच्छतादूत’ डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या स्वच्छता विचारांचीच स्फूर्ती किरणे पसरवली आणि राज्यातील ७७ विविध शहरांत राज्य सरकारच्या सहकार्याला तब्बल दीड लाखापेक्षा अधिक श्रीसदस्यांची सामूहिक आणि सक्रिय साथ लाभली.आगळा स्वच्छतायत्नग्रामीण भागात तलाठ्यापासून पोलीसपाटील, सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पं.स. आणि जि.प.सदस्य, प्रांताधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त, विभागीय पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्य सचिव अशा राज्यातील सर्वस्तरावर मोहीम सक्रिय झाली. जिल्ह्यात राबविली जाणारी स्वच्छता मोहीम हा एक दिशादर्शक उपक्रम आहे, असे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करताना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वच्छ भारत अभियान मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, तहसीलदार ऊर्मिला पाटील, तहसीलदार अजित नैराळे, एस.डी.पाटील आदि अधिकारी उपस्थित होते.
हजारो हातांनी केला रायगड स्वच्छ
By admin | Updated: November 16, 2014 23:31 IST