Join us
Daily Top 2Weekly Top 5

बच्चेकंपनीचे आकर्षण ठरतोय रेडियम बाप्पा

By admin | Updated: September 4, 2014 02:44 IST

मुलुंडमध्ये तरुणाईने रेडियमच्या पेपर स्टिक वापरून अवकाशयानाच्या सफरीसाठी निघालेल्या बाल गणोशाची साकारलेली मूर्ती बच्चेकंपनीचे आकर्षण ठरत आहे.

मुलुंड : गणोशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळाकडून काही तरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होत असतो. मुलुंडमध्ये तरुणाईने रेडियमच्या पेपर स्टिक वापरून अवकाशयानाच्या सफरीसाठी निघालेल्या बाल गणोशाची साकारलेली मूर्ती बच्चेकंपनीचे आकर्षण ठरत आहे. सध्या हाच बाप्पा आता बच्चेकंपनीचा ‘रेडियम बाप्पा’ म्हणून ओळखला जात आहे.
मुलुंडच्या देव मित्र मंडळातील तरुणांनी यंदा रंगीत रेडियम पेपर स्टिकचा बाप्पा साकारला आहे. अवकाशयानाच्या सफरीसाठी निघालेल्या बालगणोशाची मूर्ती येथे पाहावयास मिळत आहे. रेडियमने बाप्पांची 6 फूट मूर्ती आणि 2 फूट मूषक सजवण्यात आले आहे. बाप्पाच्या भोवताली अवकाशातील ग्रह, तारे, यान रेडियम स्टिकचा वापर करून साकारले आहेत. 25 दिवसांच्या मेहनतीनंतर रेडियम बाप्पा साकारला आहे. सुरुवातीला मडके, तार, लाकूड यांचा वापर करीत तरुणांनी ओ माय फ्रेंड गणोशामधील गणोशाची मूर्ती साकारली. हात, पाय सोंडेसाठी जाळीचा वापर कल्पकपणो करण्यात आला आहे. तयार झालेल्या मूर्तीवर रेडियम पेपर स्टिकचा वापर करत मूर्ती सजविण्यात आली. 1983 पासून हे मंडळ विविध पद्धतीने बाप्पांची मूर्ती साकारत आहे. सर्वाचे आयुष्य रंगीत आणि आनंदी राहावे, असा संदेश देण्यासाठी रेडियमचा बाप्पा साकारण्यात आल्याची माहिती मंडळाचे देवेंद्र गुप्ता यांनी दिली. सध्या शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर रेडियम बाप्पाला भेट देण्यासाठी येत आहेत. (प्रतिनिधी)