Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधे माँवर गुन्हा दाखल

By admin | Updated: September 2, 2015 02:19 IST

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँविरोधात बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्राने राधे माँवर

मुंबई : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँविरोधात बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्राने राधे माँवर अश्लील हावभाव केल्याचा आरोप करीत बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीवरून बोरीवली पोलिसांनी राधे माँसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कांदिवली येथील गुप्ता कुटुंबीयांतील सुनेने केलेल्या तक्रारीनुसार पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींसह राधे माँवरही कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉली बिंद्राने केलेल्या तक्रारीनुसार बोरीवली पोलिसांनी राधे माँवर गुन्हा दाखल केल्याने तिच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.