Join us

सेक्स रॅकेटमधून खंडणी उकळणारे अटकेत

By admin | Updated: March 25, 2015 23:18 IST

एका माजी उपसरपंचाला प्रवृत्त करून नंतर पत्रकार व पालघरमधील पोलिसाच्या संगनमताने ब्लॅकमेल करून ३५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

पालघर : अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नेटाळी येथील एका माजी उपसरपंचाला प्रवृत्त करून नंतर पत्रकार व पालघरमधील पोलिसाच्या संगनमताने ब्लॅकमेल करून ३५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पालघरच्या कमला पार्कमध्ये राहणारा आरोपी दिलीप शां. पाटील उर्फ डिएसपी व मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला प्रकाश पाडावे या दोन मुख्य सूत्रधारांनी या प्रकरणातील फिर्यादी असलेल्या नेटाळी येथील माजी उपसरपंचाची विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी वसई रोड येथील एका २१ वर्षीय तरुणीची भेट घडवून दिली. १५ मार्च रोजी उपसरपंच त्या तरूणीसह पालघर (अंबाडी) येथील प्रशांत रिसॉर्टमध्ये जाऊन दोन तासानंतर बाहेर पडत असताना पालघर मुख्यालयामधील पोलीस हवालदार सूर्यकांत कांबळे, निलंबित पोलीस प्रकाश पाडावे व एक बोगस पत्रकार सचीन परब, रा. विरार यांनी आपल्या पोलीस असे स्टीकर लावलेल्या तवेरा गाडीद्वारे अडवून त्यांना जबरदस्तीने गाडीत घातले. तुम्ही अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल केल्यास तुमची बदनामी होईल अशी भीती घातली व त्यांच्या खिशातील रोख रक्कम, एटीएम कार्ड जबरदस्तीने घेतले. नंतर एटीएममधून २० हजार, मित्राकडून ५० हजार, पत्नीचे दागिने गहाण ठेवून १ लाख असे एकंदरीत १ लाख ७१ हजार २०० रू. लुबाडले. यावरही समाधान न झाल्याने त्यांनी जबरदस्तीने मनोरच्या एका बँकेचे २० लाख व १५ लाखाचे चेक फिर्यादीकडून लिहून घेतले. परंतु हे चेक क्लिअर होत नसल्याने आरोपींचा दबाव वाढत चालल्याने कंटाळलेल्या उपसरपंचाने उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांच्याकउे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्र्रकरणाचा तपास करून दिलीप पाटील उर्फ डिएसपी, सूर्यकांत कांबळे (पोलीस पालघर), प्रकाश पाडावे (निलंबित पोलीस), सचिन परब (बोगस पत्रकार), विक्रम राऊत, रक्षा वाडे (नाव बदललेले) रा. वसई रोड या आरोपींना अटक केली.