Join us  

मुंबईतील स्टेशनवर शौचालयाबाहेर लोकांची रांग, आतमध्ये सापडले झोपलेले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 9:42 AM

तीन-चार तासांनी जेव्हा प्रवाशांनीच दरवाजे तोडले तेव्हा त्यांनी पाहिलं की शौचालयाच्या ठेकेदाराची माणसं आत झोपलेली होती. 

ठळक मुद्देशनिवारी मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये सगळ्यांनाचा थक्क करणारा प्रकार घडला. टर्मिनसमध्ये शौचालय असूनही ते लोकांना वापरता आलं नाही मुंबई सेंट्रल टर्मिनसमधून प्रवास करणारे प्रवासी शौचालयाबाहेर तासन तास ताटकळत राहीले, लांबच्या लांब रांग लागली पण शौचालय बंद होतं.

मुंबई- शनिवारी मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये सगळ्यांनाचा थक्क करणारा प्रकार घडला. टर्मिनसमध्ये शौचालय असूनही ते लोकांना वापरता आलं नाही. मुंबई सेंट्रल टर्मिनसमधून प्रवास करणारे प्रवासी शौचालयाबाहेर तासन तास ताटकळत राहीले, लांबच्या लांब रांग लागली पण शौचालय बंद होतं. तीन-चार तासांनी जेव्हा प्रवाशांनीच दरवाजे तोडले तेव्हा त्यांनी पाहिलं की शौचालयाच्या ठेकेदाराची माणसं आत झोपलेली होती. 

स्टेशनवर असलेल्या सार्वजनिक शौचालयातील हा पाहून शौचालयाला कुलूप ठोकल्याचा हा प्रकार प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितला पण त्यांनी एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे पाठवत टाळाटाळ केली. १२ वाजल्यापासून पहाटे ४.१५ पर्यंत शौचालय बंद होतं. चार-साडेचार तास वाट पाहिल्यानंतर जेव्हा लोकांचा धीर संपला, तेव्हा दरवाजाची दारं तोडली तर आत चक्क तीन-चार जण झोपले होते. शौचालयाच्या आत झोपलेल्या या लोकांना बाहेरच्या लोकांचा आवाज ऐकु आला नाही की त्यांनी आवाज ऐकुन दुर्लक्ष केलं? असा सवाल उपस्थित केला आहे.  

रेल्वे स्टेशनवर आम्हाला २४ तास वाय-फायची गरज नाही, मुलभूत सोयींची गरज आहे, असं प्रवासी रांगेत रागारागाने म्हणत होतं. पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल स्टेशन हे मुख्य टर्मिनस आहे. येथून दररोज अनेक गाड्यांची देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून ये-जा होत असते. येथे प्रवाशांना मुलभूत सोयींची आवश्यकता कधीही निर्माण होऊ शकते. पण शनिवारी स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.  

टॅग्स :मुंबईरेल्वे प्रवासीपश्चिम रेल्वे