नागोठणे : शहराची शुध्द पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असतानाही ती अद्यापि कार्यान्वित झाली नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे. त्याकरिता सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची नागोठण्यात बैठक घेऊन या योजनेतील अडचणी समजून पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा करणार असल्याचे आ. धैर्यशील पाटील यांनी सांगितले. शासनाच्या यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत धैर्यशील पाटील यांनी येथील मीरा मोहिद्दीन शाहबाबा यांच्या दर्ग्यासमोर पेव्हर ब्लॉक रस्ता तसेच कमानीसाठी चार लाख रु पयांचा निधी दिला असून या दोन्ही कामांचा उद्घाटन समारंभ पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. शेकापचे नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, पालीचे सरपंच राजेश मापारा, शिवराम महाबळे, अनंत वाघ, डॉ. अन्वर हाफीज, काँग्रेसचे नेते निजाम सय्यद, असगर मुल्ला, शब्बीर पानसरे, शिवसेना शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष सिराज पानसरे, अखलाक पानसरे, बशीर शिंदी, असगर मांडलेकर, वरवठणेचे सरपंच गणपत म्हात्रे, जनार्दन सकपाळ, कासम शिंदी, अब्बास पानसरे, नजीर मोहने, नाझीम सय्यद, विनायक निंबाळकर, विकास मेस्त्री आदी मान्यवरांसह शेकाप कार्यकर्ते आणि मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील रस्त्यांसाठी वीस लाख रु पये देण्याचा दिलेला शब्द मी पूर्ण करणारच असून पक्षभेद न करता ग्रामपंचायतीने त्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. येथे विकासकामे करताना कोणताही पक्षभेद करणार नसून सत्ताधारी नेत्यांनीही तसे करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. निजाम सय्यद आणि असगर मुल्ला यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. प्रास्ताविक अनंत वाघ, यांनी केले. (वार्ताहर)
पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार
By admin | Updated: March 30, 2015 22:31 IST