ठाणे: येथील उपवन तलावाजवळील रस्त्यावर भरघाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसाकडून रविवारी कारवाई सुरु असतांना निशांत खोना याने आनंद लकडे या हवालदारालाच अर्वाच्य शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलीसांनी दिली.उपवन तलाव भागात लकडे यांच्यासह त्यांचे पथक ८ मार्च रोजी रॅश ड्रायव्हींग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास उभे होते. त्यावेळी हुंदाई कारमधून आलेल्या निशांतकडे त्यांनी वाहन परवान्याची मागणी केली. तसेच गाडीच्या काळया फिल्म काढण्यास बजावले. याचाच राग आल्याने त्याने गाडीतून उतरुन अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ‘ठहरो मैं तुमको दिखाता हॅू’, असा इशारा करुन त्यांना धमकावले. नंतर वाद घालून त्यांच्या सरकारी गणवेषाशी झटापट करुन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी त्याच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करुन अटक केली.
परवाना विचारणा-या हवालदाराला धक्काबुक्की
By admin | Updated: March 10, 2015 00:22 IST