Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक; राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण

By रतींद्र नाईक | Updated: November 29, 2023 20:51 IST

राखीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून अतिरिक्त न्यायाधीश व्हाय बी भोसले यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

मुंबई : पूर्वाश्रमीचा पती आदिल दुराणी याचे खासगी व्हिडीओ मीडियावर लिक केल्या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआर विरोधात ड्रामा क्वीन राखी सावंत हिने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. राखीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून अतिरिक्त न्यायाधीश व्हाय बी भोसले यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल दुराणी याचे व्हिडीओ मीडियासमोर लिक केल्या प्रकरणी राखी विरोधात आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अटक होऊ नये यासाठी राखी सावंतने मुंबई सत्र न्यायालयात ऍड अली काशीफ खान यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.

या अर्जावर अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश व्हाय बी भोसले यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी प्रतिवादी आदिल दुराणी याने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. तर पोलिसांनी आपले म्हणणे न्यायालयात सादर केले. न्यायाधीशांनी याप्रकरणाची सुनावणी तहकूब करत राखीला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले.