Join us

चोरांचा पाठलाग करणे बेतले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:15 IST

झटापटीत माेबाइल मालकाचा मृत्यू : जे. जे. मार्ग पाेलिसांकडून एकाला अटकएकाला अटक : जे. जे. मार्ग पोलिसांची कारवाई...

झटापटीत माेबाइल मालकाचा मृत्यू : जे. जे. मार्ग पाेलिसांकडून एकाला अटक

एकाला अटक : जे. जे. मार्ग पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोबाइल चोरांसाेबत झालेल्या झटापटीत आणि त्यांचा पाठलाग करताना जे. जे. मार्ग परिसरात इरफान सिद्दिकी (५५) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी जे. जे. मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी दोन चोरांनी त्यांचा मोबाइल हिसकावला. यादरम्यान त्यांच्यात झटापट झाली. सिद्दिकी यांनी मोबाइल परत मिळविण्यासाठी पाठलाग सुरूच ठेवला. यात, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी शरीफउद्दीन खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला.

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी बुधवारी एका आरोपीला झकारिया स्ट्रीट येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.